Money : पैसा नितीधर्माने मिळवावा...


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली, तर तो पैसाच दूर केला, तर नाही चालणार? पैसा टाकून देऊ नका. पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जीवापाड श्रम करून जो कमवायचा, तोच जर दुःखाला कारण होऊ लागला, तर काय उपयोग? पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे, किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे. पैसा मिळवावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही, तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला आणि यदाकदाचित तो गेला, तर भगवंताच्या इच्छेने गेला, असे म्हणून, आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही; आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते.
अशी म्हण आहे की, ‘पैसा पुरून उरावा इतका मिळावा.’ पण आपल्याला जगात काय आढळते? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही ‘पुरून उरणे’ नव्हे. याच्या उलट, आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे. मनुष्य नेहमी म्हणतो की, ‘माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे; मी काय, आज आहे आणि उद्या नाही.’ पण आपण जसे खात्रीचे नाही, तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही.


पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले, असे योगवसिष्ठात वर्णन आहे. तसे ते आपल्यालाही लागू आहे; फरक एवढाच की, रामाचे उदासपण पैसा ‘असणेपणाचे’ होते आणि आपले उदासपण पैसा ‘नसणेपणाचे’ आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे, कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते. पण त्याबरोबरच भगवंत हवा, असेही आपल्याला वाटते. आता, आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा. त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी, म्हणजे लक्ष्मीसाठी, सर्व जीवन खर्च करतो. पण ती त्याचा मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की, ती आपला नाश न करता, आपल्या आनंदाला कारण होते. पैसा हा नितीधर्मानेच मिळवावा; तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

ठरलं तर ! इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात होणार 'या' महाराजांचे कीर्तन

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार

श्रद्धा की अंधश्रद्धा?

आत्मज्ञान : प्राची परचुरे-वैद्य मानवी जीवनाच्या घडणीत ‘श्रद्धा’ हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

आत्मतेजाचा निनाद अंतरी सद्गुरूंचा नाद

ऋतुराज : ऋतुजा केळकर “वाऱ्याच्या लयीसंगे विवेक जागतो... स्मरणातल्या सुरांनी मन शुद्ध होतं... सद्गुरूंच्या कृपेने

मनुष्य जन्म

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आपण सध्या प्रबोधनासाठी घेतलेला विषय म्हटला तर अत्यंत कठीण आहे. म्हटले तर खूप

ज्ञानाचा सोपान

भारतीय संत : डॉ. अनुराधा कुलकर्णी निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांच्या नावाची संगती

Hanuman Jayanti 2026 Wishes : हनुमान जयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे भक्तिपर संदेश

मुंबई : हनुमान यांची जयंती म्हणजे भक्ती, शक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव. या पवित्र दिवशी अनेकजण उपवास, पूजा आणि