Wednesday, July 24, 2024
HomeदेशG20 Summit : केंद्रीय मंत्री करणार परदेशी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

G20 Summit : केंद्रीय मंत्री करणार परदेशी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांचे स्वागत

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेत (g-20 summit) भारतात येणाऱ्या परदेशातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री तैनात करण्यात आले आहेत. सर्व केंद्रीय मंत्र्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे स्वागत जनरल वी के सिंह करतील. तर इटलीचे पंतप्रधान, बांगलादेशचे पंतप्रधान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांचे स्वागत अनुक्रमे शोभा करंदलाजे, दर्शना जरदोश, अश्विनी चौबे आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर करतील.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्षांच्या स्वागताची तयारी नित्यांनंद राय, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची तयारी अनुप्रिया पटेल, जर्मन चान्सेलरसाठी बीएल वर्मा आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी श्रीपाद नाईक यांना सांगण्यात आले आहे. याचपद्धतीने सिंगापूरचे पंतप्रधानांना एल मुरूगन, युरोपीय संघ प्रमुखांना प्रल्हाद पटेल, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष शांतनू ठाकूर आणि चीनच्या पंतप्रधानांना व्ही के सिंह रिसीव्ह करतील.

यातच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी म्हटले की जी-२०चे यजमानपद भूषवणे हा भारतासाठी सुवर्णमय क्षण आहे. भारताने गेल्या वर्षी जी-२०चे अध्यक्षपद सांभाळले होते.

जी-२० परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय संघ(२७ सदस्यीय समूह) या देशांचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -