India vs Bharat : 'भारत'च आपलं मूळ नाव... काय म्हणाले गावस्कर आणि सेहवाग?

नावबदलाच्या वादात क्रिकेटवीरांची उडी


मुंबई : भारत (Bharat) हे आपल्या देशाचे मूळ नाव आहे, तर 'इंडिया' (India) हे आपल्याला इंग्रजांनी दिलेले नाव आहे, अशी भूमिका भाजपने (BJP) घेतली आहे. या भूमिकेला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. भाजपने हा मुद्दा वर उचलून धरल्यामुळे 'भारत' या नावासाठी आग्रही असलेले भारतीय आता व्यक्त होऊ लागले आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील या संदर्भात 'भारत माता की जय' असं ट्वीट करत नावाला पाठिंबा दर्शवला होता. यानंतर आता क्रिकेट जगतातील दिग्गज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले आहे.


सुनील गावस्कर म्हणाले, "भारत हेच आपल्या देशाचे मूळ नाव आहे. त्याला एक सुंदर नाद आहे. पण या गोष्टी अधिकृत स्तरावर मान्य करणं गरजेचं आहे. सरकारी स्तरावर किंवा 'बीसीसीआय'च्या स्तरावर जर हा मुद्दा मान्य झाला तर आपल्या संघाचे नाव 'भारत क्रिकेट टीम' करता येऊ शकेल. याआधीही बऱ्याच ठिकाणी असे बदल झाले आहेत. बर्मा नाव बदलून आता त्याचे म्यानमार करण्यात आले. त्यामुळे मूळ नावाने जर देश ओळखला जाणार असेल तर मला तरी त्यात काहीच वावगं वाटत नाही. पण मुद्दा एवढाच की जे बदल होतील ते सर्व स्तरावर सरसकट व्हायला हवेत," असे स्पष्ट मत सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.


याचबरोबर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) देखील बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना पत्र लिहिले होते. त्यात त्याने म्हटले होते की, "मला नेहमी असे वाटायचे की भारत या नावानेच आपला देश ओळखला जावा. आपण सारे भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिले होते. आता ते नाव बदलायला हवे. त्यांनी केलेला बदल हा त्यांच्या सोयीसाठी होता. आता आपण पुन्हा मूळ नाव भारत ठेवायला हवे. त्यामुळेच माझी अशी इच्छा आहे की भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर छातीवरील इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव लिहिले जावे."



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांची गळचेपी

मागील ११ वर्षांत मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ११० हून अधिक मराठी शाळांना टाळे मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याला महापालिका निवडणुकांचा फटका !

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारी दरम्यान, शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर गंभीर

अभासेच्या गीता आणि योगिता गवळी यांनी भरले उमेदवारी अर्ज

दिवसभरात सात जणांनी भरले अर्ज मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई