Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणPen news : पेण मध्ये 'आई डे केअर'च्या गतीमंद मुलांनी हंडी फोडत...

Pen news : पेण मध्ये ‘आई डे केअर’च्या गतीमंद मुलांनी हंडी फोडत लुटला दहीहंडीचा आनंद

पारितोषिकांचेही झाले वाटप

पेण : आज संपूर्ण देशभरामध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. पण शारीरीक कमतरतेमुळे गतीमंद आणि अपंग मुलांना हा आनंद घेता येत नव्हता. यासाठीच पेणमधील ‘आई डे केअर’ स्कुलने अनोखा उपक्रम राबवत गतीमंद मुलांच्या दहीहंडीचे आयोजन केले होते.

या दहीहंडी उत्सवामध्ये ५४ गतीमंद मुलांनी सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद लुटला. ही विशेष मुलं पाण्याच्या फवाऱ्यात व आनंदात चिंब भिजली होती. यावेळी निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. गतिमंद मुलांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचे काम ‘आई डे केअर’ संस्था करत असून गेल्या १३ वर्षांपासून रामेश्वर कन्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचीका यांनी आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद होत असल्याचे स्वाती मोहिते यांनी व्यक्त केले.

रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचीका यांच्या मार्फत हा अनोखा उपक्रम राबविण्याचे हे तेरावे वर्ष आहे. या कार्यक्रमानंतर सर्व गतिमंद मुलांना पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ, उद्योजक राजू पिचिका आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -