पाकिस्तानचा भोंगळ कारभार, पावसामुळे नव्हे तर या कारणामुळे थांबला पाकिस्तान-बांगलादेश सामना

लाहोर : आशिया कप २०२३मधील(asia cup 2023) पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या सुपर ४मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. बांगलादेशला १९३ धावांवर रोखल्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा संघ मैदानावर खेळण्यासाठी उतरला तेव्हा फ्लड लाईट बंद झाल्याने सामना थांबवावा लागला.


पाकिस्तान क्रिकेट मॅनेजमेंटने फ्लड लाईटची समस्या दूर केली मात्र या कारणामुळे २० मिनिटे खेळ थांबवण्यात आला. पाकिस्तानच्या या भोंगळ कारभाराची क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. क्रिकेट चाहते पीसीबीला चांगलेच धारेवर धरत आहेत.



पाकिस्तानची क्रिकेट चाहत्यांनी उडवली खिल्ली










पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची कमाल


फ्लड लाईट खराब झाल्याने भले पीसीबीला सगळेजण बोल लावत आहेत मात्र त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी लाहोरमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रऊफ आणि नसीम शाहने मिळून बांगलादेशचे ९ विकेट पडल्या आणि संपूर्ण संघ १९३ धावांवर आटोपला.

Comments
Add Comment

IND vs SL: श्रीलंकाने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार फलंदाजी

दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात आज भारत आणि श्रीलंका यांच्यात टक्कर आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सुपर

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर