आता गणपतीची पुजा करा ऑनलाईन, डोंबिवतील 'ऑल इन वन गुरुजी'ची संकल्पना

डोंबिवली : गणपती बाप्पांचे आगमन केवळ काहीच दिवसांवर आले आहे. गणपतीच्या पहिल्या दिवशी गुरुजींच्या उपस्थितीत साग्रसंगीत पुजा केली जाते. मात्र अनेकदा गुरूजींच्या अनुपस्थितीमुळे अथवा त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांची गैरसोय होते. हीच गैरसोय लक्षात घेता डोंबिवलीतील "ऑल इन वन गुरुजी' या संस्थेने नामी शक्कल लढवली आहे.


गुरूजींच्या अनुपस्थितीत स्वत:च घरच्या गणपतीची पुजा कशी करावी याची माहिती या संस्थेने दिली आहे. त्यासाठ १९ सप्टेंबरला ऑल इन वन गुरूजी या यूट्यूब चॅनेलवर गुरूजी पाच वेळा लाईव्ह येत संपूर्ण पुजेची विधी तसेच आरती मराठी आणि हिंदी भाषेत समजावून सांगणार आहेत. तसेच गणेशभक्तांकडून ऑनलाईन पद्धतीने पुजाही करून घेणार आहेत.


गुरुजी सचिन कुलकर्णी आणि आयटी तज्ञ सागर धारगळकर यांनी ही नवी संकल्पना आणली. त्यांच्या या यूट्यूब चॅनेलवर पहाटे ४ वाजता, ६ वाजता, ८ वाजता, १० वाजता आणि दुपारी १२ वाजता ही पुजा सांगितली ाणार आहे.


या ऑल इन वन गुरूजी वेबसाईट तसेच अॅपचे उद्घाटन १ सप्टेंबरला करण्यात आले. या अॅपमध्ये १०० पेक्षा जास्त विविध भाषिक गुरूजींचा समावेश आहे.


Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व