Jayant Patil : जयंत पाटील अखेर खरे बोलले, कोरोनाकाळात सगळ्यांनीच लुबाडले!

Share

सांगली : आरोग्याच्या सुविधांबाबत आम्ही कधीच शहाणे आणि सजग नव्हतो. कोरोना आल्यानंतर आपल्याला आरोग्याच्या सुविधांचे महत्त्व कळले. कोरोना महामारीच्या काळात सगळ्यांनीच जनतेला लुबाडले, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बोलण्याच्या ओघात दिली.

डिग्रज रुग्णालयाच्या कामासंदर्भात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. इस्लामपूरमध्ये वैद्यकीय उपकरणे प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.

कोरोना काळात आरोग्य सुविधा का महत्त्वाच्या आहेत हे कळले आहे. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये उपचारसाठी आत गेलेली माणसं कमी बाहेर आली. आता व्हाईट पेपर काढला पाहिजे की कोणाच्या हॉस्पिटलमध्ये किती लोकं आत गेली. या काळात असेही हॉस्पिटल होते की एखादा श्रीमंत माणूस आला की याचा ऑक्सिजन काढून त्या श्रीमंत व्यक्तीला लावायचा असे उद्योग वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये झालेले असा आरोपीही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

कोरोना काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट

कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडली होती. असे असताना त्या काळात दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची लूट झाली. कोरोना संकटाच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करणारे जेवढे होते, त्यापेक्षा कितीतरी मोठ्या संख्येने रुग्णांना त्यांच्या अडचणीचा फायदा घेत लुबाडणारे दिसून येत होते.

राज्यातील सरकारी, खासगी दवाखाने रुग्णांनी खचून भरले होते. सरकारी दवाखान्यांमध्ये तर काही ठिकाणी एकाच बेडवर दोन ते तीन रुग्ण उपचार घेत असल्याचेही विदारक चित्र आले होते.

रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट

सांगलीसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही अशी परिस्थिती पाहायला मिळाली होती. रुग्णालयांमध्ये खाटा शिल्लक नसल्याने अत्यवस्थ रुग्णांना उपचारासाठी दाखल करताना नातेवाईकांवर वेगवेगळ्या रुग्णालयांची उंबरठे झिजवण्याची वेळ आली होती. खासगी रुग्णालयांमध्ये उपचारांच्या नावाखाली आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर या औषधाचा तुटवडा निर्माण झाला असल्याने नातेवाईकांना त्यासाठी धावपळ तसेच अनेकदा गरजेपोटी अव्वाच्या सव्वा दरात हे औषध घेण्याची वेळ येत असल्याची ओरड सुरु होती. अत्यावश्यक स्थितीत वेळेवर ऑक्सिजन न मिळू शकल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

27 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

58 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

2 hours ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago