India vs Bharat : 'इंडिया' ही इंग्रजांनी दिलेली शिवी

भारत-इंडिया वादावर भाजप खासदारांची स्पष्ट भूमिका


नवी दिल्ली : आज राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) जी-२० प्रतिनिधींसाठी रात्रीच्या जेवणाचे आलेले अधिकृत निमंत्रण खूप मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया (President of India) ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत (President of Bharat) असा उल्लेख केला. विरोधकांनी यावर अनेक सवाल उठवले असले तरी भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव 'इंडिया' ठेवले म्हणून हा बदल करण्यात आला नसून यासंबंधी गेले सहा महिने चर्चा सुरु आहे, असे भाजपने सांगितले आहे.


भाजप खासदार हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारत हा शब्द वापरण्यामागील केंद्र सरकारची भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले, 'इंडिया' या शब्दाचे वर्णन गुलामगिरी आणि दास्यत्वाचे प्रतीक म्हणून केले जाते. तर भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे, सांस्कृतिक संपत्तीचे, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे.


पुढे ते म्हणाले, इंग्रजीतील इंडिया हा शब्द म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण एक अशिक्षित समुदाय आहोत. जगात असलेल्या अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, मूर्ख लोक अशा लोकांना त्यांनी इंडिया शब्द दिलेला आहे. पण आपल्या इथे अशा विकृत मानसिकतेचे घटक आहेत जे लोकांची दिशाभूल करतात की, इंग्रज सिंधमधून आले होते, त्यांना सिंध बोलता येत नव्हते, ते इंद बोलत असत… हळूहळू इंडिया बनला, असं ते म्हणाले.



'इंडिया' ही इंग्रजांनी दिलेली शिवी


हरनाथ सिंह यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले, “मला त्या मूर्ख, वेड्या लोकांना विचारायचे आहे की जर सिंध इंडिया झाला तर इंडोनेशियामध्ये सिंध नदी कुठे होती? अँग्लो-इंडियन ज्या भागात राहत होते त्या भागात सिंध नदी कोठे होती? असे अनेक देश आहेत जिथे इंड हा शब्द आहे, कुठे सिंध नदी होती? इंडिया हा शब्द आपल्याला इंग्रजांनी दिलेली शिवी आहे, त्यामुळे इंडिया हा शब्द हटवावा.



देशातील जनतेने भारत म्हटलं पाहिजे


पुढे भारत या शब्दाचं महत्त्व आणि इतिहास पटवून देताना वेदातील एका श्लोकाचा संदर्भ देत हरनाथ सिंह यादव म्हणाले की, महासागराच्या उत्तरेला हिमालय आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात, इथल्या लोकांना भारतीय लोक म्हणतात. त्यामुळे इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा. संपूर्ण देशाला हे हवे आहे, कानाकोपऱ्यातून मागण्या येत आहेत, आमच्या आदरणीय आरएसएस सरसंघचालकांनीही भारत शब्दासाठी आवाहन केले आहे की, देशातील जनतेने भारत हा शब्द बोलला पाहिजे, इतर कोणताही शब्द बोलू नये. या देशाचे नाव भारत आहे, दुसरे नाव नाही. भारत या शब्दात जो आत्मा आहे, तो जिवंत आहे, तो आपल्याला ऊर्जा देतो, श्रद्धेची भावना दाखवतो, तसा इंडियात नाही, असंही ते म्हणाले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी