नवी दिल्ली : आज राष्ट्रपती भवनातील (Rashtrapati Bhavan) जी-२० प्रतिनिधींसाठी रात्रीच्या जेवणाचे आलेले अधिकृत निमंत्रण खूप मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया (President of India) ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत (President of Bharat) असा उल्लेख केला. विरोधकांनी यावर अनेक सवाल उठवले असले तरी भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवले म्हणून हा बदल करण्यात आला नसून यासंबंधी गेले सहा महिने चर्चा सुरु आहे, असे भाजपने सांगितले आहे.
भाजप खासदार हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी माध्यमांशी संवाद साधताना भारत हा शब्द वापरण्यामागील केंद्र सरकारची भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘इंडिया’ या शब्दाचे वर्णन गुलामगिरी आणि दास्यत्वाचे प्रतीक म्हणून केले जाते. तर भारत हा शब्द आपल्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचे, सांस्कृतिक संपत्तीचे, सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे.
पुढे ते म्हणाले, इंग्रजीतील इंडिया हा शब्द म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण एक अशिक्षित समुदाय आहोत. जगात असलेल्या अशिक्षित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, मूर्ख लोक अशा लोकांना त्यांनी इंडिया शब्द दिलेला आहे. पण आपल्या इथे अशा विकृत मानसिकतेचे घटक आहेत जे लोकांची दिशाभूल करतात की, इंग्रज सिंधमधून आले होते, त्यांना सिंध बोलता येत नव्हते, ते इंद बोलत असत… हळूहळू इंडिया बनला, असं ते म्हणाले.
हरनाथ सिंह यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले, “मला त्या मूर्ख, वेड्या लोकांना विचारायचे आहे की जर सिंध इंडिया झाला तर इंडोनेशियामध्ये सिंध नदी कुठे होती? अँग्लो-इंडियन ज्या भागात राहत होते त्या भागात सिंध नदी कोठे होती? असे अनेक देश आहेत जिथे इंड हा शब्द आहे, कुठे सिंध नदी होती? इंडिया हा शब्द आपल्याला इंग्रजांनी दिलेली शिवी आहे, त्यामुळे इंडिया हा शब्द हटवावा.
पुढे भारत या शब्दाचं महत्त्व आणि इतिहास पटवून देताना वेदातील एका श्लोकाचा संदर्भ देत हरनाथ सिंह यादव म्हणाले की, महासागराच्या उत्तरेला हिमालय आहे आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेल्या भूमीला भारत म्हणतात, इथल्या लोकांना भारतीय लोक म्हणतात. त्यामुळे इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरावा. संपूर्ण देशाला हे हवे आहे, कानाकोपऱ्यातून मागण्या येत आहेत, आमच्या आदरणीय आरएसएस सरसंघचालकांनीही भारत शब्दासाठी आवाहन केले आहे की, देशातील जनतेने भारत हा शब्द बोलला पाहिजे, इतर कोणताही शब्द बोलू नये. या देशाचे नाव भारत आहे, दुसरे नाव नाही. भारत या शब्दात जो आत्मा आहे, तो जिवंत आहे, तो आपल्याला ऊर्जा देतो, श्रद्धेची भावना दाखवतो, तसा इंडियात नाही, असंही ते म्हणाले.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…