मुंबई : एका आठवड्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. बॉलीवूडचे हे दोन मोठे स्टार नक्की कुठे धावत जात आहेत याचं कुतूहल सगळ्यांना आहे. आता हे नक्की कुठे धावत चालले आहेत हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
आगामी प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती न देता हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. पहिला फोटो रिलीज होताच दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्यानं इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.
जेव्हा पहिला फोटो रिलीज झाला तेव्हा शाहरुख खानने सोशल मीडियावर देखील शेअर केले आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना त्याला किती मजा येणार आहे आणि तो या प्रोजेक्ट साठी उत्सुक आहे.