Jalna Maratha Andolan : मराठा समाज मागास आहे हे सिद्ध व्हायला हवे

उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?


मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने उपसमितीची एक बैठक आज संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळेस मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याच्या संदर्भात समिती नेमली असून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी महिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. मी स्वत: उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी बोललो. त्यांच्या आंदोलनावर सरकार काम करत आहे. आधीचे सरकार सुप्रीम कोर्टासमोर काही बाजू मांडू शकले नाही. मराठा समाज मागास नाही, हे सर्वोच्च न्यायायलयाने म्हटलं आहे. मराठा समाज मागास आहे, या बाबी कोर्टासमोर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.


पुढे ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व ते टिकले पाहिजे ही आमची भूमिका आहे. आम्ही टास्क फोर्सची स्थापना केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सिद्ध व्हायला हवे. सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जे फायदे मिळतात ते देत आहोत. आंदोलनांच्या आडून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.



३७०० तरुणांना नोकरी मिळवून दिली


याआधी अधिसंख्यापदावर ३७०० तरुणांना आम्ही नोकरीत सामावून घेतलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेकांना कर्ज दिलं. त्याचं व्याज सरकार भरत आहे. मराठा समाजाने थोडा संयम राखण्याची गरज असल्याच शिंदे यांनी म्हटलं.



आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न


दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे. आम्हाला या मुद्द्याचं राजकारण करायचं नाही. तसेच लाठीचार्जची चौकशी करण्यात येणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदीबाबत तपासणी करण्यासाठी वेळ लागेल. ते काम सुरू असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार : कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई : सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला

एन. ए.' परवानगी इतिहासजमा

•बांधकाम नकाशा हीच एन. ए. परवानगी •जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज •महसूलमंत्र्यांची जमीन

मानसिक आरोग्य आणि सर्वसमावेशक कार्यालयीन भारतीय संस्कृती ही काळाची गरज

मुंबई : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य आणि सर्वसमावेशकता या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी घनिष्ट संबंध येतो. या

रूस्तमजीकडून मुंबईतील ऐतिहासिक वाडिया क्लॉक टॉवरचे नूतनीकरण

मुंबई : रूस्तमजी ग्रुप या मुंबईतील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकाने फोर्ट परिसरातील ऐतिहासिक 'बोमनजी होरमरजी

देशातील पहिला क्लायमेट वीक मुंबईत

मुंबई : हवामान बदलाच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर भारतातील पहिला मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्ल्यू) १७ ते १९

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रातील जागतिक आणि गुंतवणूक शिखर परिषद महाराष्ट्रात

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी,