Jalna Maratha Andolan : आज निर्णय झाला नाही तर पाणीही घेणार नाही : मनोज जरांगे

मनोज जरांगे यांचं आंदोलन आणखी तीव्र


जालना : जालना येथे मराठा समाजाच्या लोकांनी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनावर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा प्रश्न फारच चिघळला आहे. राज्यभरात याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली. मात्र आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका घेत त्यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र केलं आहे.


माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, आम्ही सरकारचं ऐकतोय, प्रतिसाद देतोय, डॉक्टरांचंही ऐकतोय. सरकारने आज निर्णय घेतला नाही तर पाणीही घेणार नाही. मी आता तसं बोलण्याच्या मूडमध्ये नाही. सरकार शंभर टक्के प्रयत्न करतंय, बैठका घेत आहे. मी आणि माझा समाज सरकारला, डॉक्टरांना प्रतिसाद देणार आहे. शंभर टक्के निकाल लागेल. आज आम्हाला न्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.


ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आंदोलनकर्त्यांचे नेते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी त्यांना चर्चेचा प्रस्ताव दिला. फडणवीसांनी जरांगे यांना जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणात न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आंदोलकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.


या पार्श्वभूमीवर आज दुपारी मराठा आरक्षणविषयक कॅबिनेटच्या उपसमितीची बैठक पार पडणार असून यामध्ये आरक्षणासंबंधी चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी