प्रहार    

Crime : मुंबईत एअर होस्टेसची गळा चिरून हत्या

  272

Crime : मुंबईत एअर होस्टेसची गळा चिरून हत्या

मुंबई : मुंबईत एअर होस्टेस म्हणजेच हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या (crime) झाल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


मुंबईतल्या पवई भागातील मरोळ येथील एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये ही घटना घडली. रुपल ओगरे असे मृत एअर होस्टेसचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील होती. सध्या ती मुंबईत भाड्याने राहत होती.


रुपल ओगरे हिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही राहत होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झाली त्या दिवशी रुपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स गावी गेल्यामुळे तिच्यासोबत घरी कुणीच नव्हते.


तिच्या कुटुंबीयांनी तिला अनेकदा कॉल केला. पण ती त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे काळजीपोटी त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला फोन करून तिची माहिती काढण्यास सांगितले. त्यानंतर तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. तिने बराच वेळ दार ठोठावून पाहिल्यानंतरही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.


त्यामुळे तिने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिच्या पायाखालची वाळूच सरकली. रुपलचा मृतदेह गळा चिरल्याच्या स्थितीत फ्लॅटमध्ये पडलेला होता. त्यानंतर या प्रकरणाची माहिती तत्काळ पवई पोलीस व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


दरम्यान, २३ वर्षीय हवाई सुंदरी हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. हत्येप्रकरणी इमारतीत सफाईचे काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Dadar Kabutar Khana : जैन लोकांनी आंदोलन केलं ते चाललं, आम्हाला मात्र ताब्यात घेतलं, हा दुजाभाव का?

मराठा एकीकरण समितीचा सवाल मुंबई : दादर कबुतरखाना परिसरात घडलेल्या ६ ऑगस्टच्या घटनेचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर

Kabutar Khana : "शस्त्र उचलणार असाल तर"...दादर कबुतरखाना प्रकरणात मराठी एकीकरण समितीचा आक्रमक पवित्रा

मुंबई : हायकोर्टाच्या आदेशानुसार दादर येथील कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून मागील

गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा डबल धमाका

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत रेल्वेसेवा मुंबई :

Dadar Kabutar Khana : कबुतरखाना वाद तापला; मराठी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई : दादर कबुतरखाना (Kabutar Khana Dadar) बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आज, १३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली

आझाद मैदान दंगल : १३ वर्षे झाली, तरी वसुली नाही व कारवाई शून्य !

हानीभरपाईची कारवाई थांबवणे धक्कादायक; दोषींवर दिवाणी दावे दाखल करून रझा अकादमीकडून वसुली करा ! - हिंदु जनजागृती

चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे