MNS Vasant More : '...तर मनसेचा पहिला खासदार मीच', वसंत मोरे यांना विश्वास

बारामती दौऱ्यावर असताना वसंत मोरे यांचे मोठे विधान


बारामती : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. इतर पक्षांप्रमाणेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेने (MNS) देखील बैठका, दौरे सुरू केले आहेत. मनसेचा सध्या बारामती दौरा (Baramati visit) सुरु आहे. दरम्यान मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे (Vasant More)बारामती दौऱ्यावर आले होते. कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


मनसे कार्यकर्ते आमदार म्हणून तुमच्याकडे पाहत आहेत, याबाबत वसंत मोरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, 'नाही, मला तर यावर्षी खासदार व्हायचे आहे. पुण्याचा खासदार होण्यास मी इच्छुक आहे. मला वाटतं की माझ्या पक्षाने मला संधी दिली, तर यावर्षी महाराष्ट्रातला पहिला मनसेचा खासदार हा वसंत मोरे १०० टक्के असेल'.


मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. वसंत मोरे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मनसे सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी अनेकदा बोलून दाखवले. यातच आता वसंत मोरे यांना बारामती लोकसभा प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी मोठे विधान केले आहे. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी यावेळी दिली. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काय पाऊल उचलायचे? हे राज ठाकरे ठरवतील. पण बारामती शहरात लवकरात लवकर आम्ही राज ठाकरेंना आणणार आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा पहिला मेळावा बारामती शहरात होईल, असेही वसंत मोरे यांनी सांगितले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम