मुंबई: शाहरूख खानचा (shahrukh khan) आगामी सिनेमा जवान (jawan) सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगच्या सुरूवातीचे आकडे पाहता असे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी असणार आहे. जवानचे तिकीट बुकिंगचे आकडे पठाणच्या ओपनिंग रेकॉर्डच्या बरोबर आहे. सिनेमा अद्याप रिलीज झालेला नाही.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार जवानच्या अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे २ लाखापर्यंत पोहोचले आहेत. पीव्हीआर आणि आयनॉक्स मिळून तब्बल १ लाख ८३५०० इतके बुकिंग झाले आहेत. तर सिनेपोलिस येथे ३९ हजार तिकीटांची बुकिंग झाली आहे. म्हणजेच एकूण मिळून २२२,५०० तिकीटे बुक झाली आहेत.
पठाण आणि गदर २ या सिनेमांप्रमाणेच शाहरूखच्या या सिनेमालाही प्रचंड गर्दी होणार असल्याचे दिसत आहे. कारण ही तिकीटे धडाधड विकली जात आहेत. अनेक थिएटरमध्ये तर शाहरूखच्या जवानचा पहिल्या दिवसाचा शो हाऊसफुल्ल आहे. वीकेंडलाही शो हाऊसफुल्ल होत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरूख खानच्या चाहत्यांनी मुंबईच्या वांद्रे स्थित Gaiety आणि गॅलॅक्सी थिएटरचे सकाळचे शोज बुक झाले आहेत. लोकांच्या प्रतिक्रिया पाहता हा सिनेमा ब्लॉकबस्टर असल्याचे म्हटले जात आहे. मात्र ७ सप्टेंबरच्या आधी काहीही म्हणणे घाईचे ठरेल. कारण त्या दिवशी समीक्षक सिनेमाच्या समीक्षेबद्दल सांगतील.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…