Nitesh Rane : काल हिंदूंना अस्वस्थ करणारी घटना मातोश्रीत घडली

  233

उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर आमदार नितेश राणे आक्रमक


कणकवली : काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूला अस्वस्थ करणारी घटना मातोश्री कलानगर मध्ये घडली. ज्या पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रामनवमीला बंदी आहे, हिंदूंवर अत्याचार होतात त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मातोश्रीवर जातात आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राखी बांधतात. ज्या मातोश्री मध्ये बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) हिंदूंचा आवाज बुलंद केला, १९९३ च्या दंगलीत हिंदूंना वाचवलं त्याच मातोश्रीत हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या ममता बॅनर्जी कडून उद्धवजी राखी बांधून घेतात. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आता त्यांनी समजून सांगावं, असं आव्हान भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर सवाल उठवला आहे.


नितेश राणे म्हणाले, कालचे चित्र बघून मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिग्यांनी दिवाळी साजरी केली असेल. परत चुकून मुंबईत सत्ता उद्धव ठाकरेंकडे आली तर मुंबईत हिंदू कमी होऊन बांगलादेशी आणि रोहिंगेचे शहर होईल, हे चित्र काल रक्षाबंधनच्या निमित्ताने दाखवण्यात आलं. काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि पेंग्विनच राहुल गांधींचं जास्त कौतुक करतायत, सोनिया गांधींचं गुणगान गातायत. पण जर खरंच तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असाल तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांना शिवाजीपार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करायला लावा, असं नितेश राणे यांनी उबाठा गटातील नेत्यांना आवाहन केलं आहे.


वीर सावरकरांचा नेहमी अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं. एका बाजूला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचं, दुसर्‍या बाजूला सावरकरांचा द्वेष करणार्‍या राहुल गांधींसोबत बसायचं आणि स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचं, अशा उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा समोर आला पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.



संजय राऊतच राहुल गांधी बरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करेल


भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांच्यावर लोकांचं वाढलेलं प्रेम दिसून येत आहे या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधीबरोबर व्हॅलेंटाईन डे संजय राऊतच साजरा करेल, बाकी कोणीच त्यांच्यावर प्रेम करताना दिसलं नाही म्हणून तर काँग्रेसची एवढी पिछेहाट झाली.



इंडिया आघाडीने हुकूमाचा एक्का बाहेर काढावाच


आम्ही वाट बघतोय की इंडिया आघाडीचे लोक हुकूमाचा एक्का कधी बाहेर काढतायत. त्यानंतर नितीशकुमार काय भूमिका घेतील , अरविंद केजरीवाल कुठले पत्ते टाकतील आणि मग काँग्रेसची काय अवस्था होईल, हे जाणण्यासाठी आमची खरंच इच्छा आणि उत्सुकता आहे की त्यांनी हुकूमाचा एक्का बाहेर काढावा, असं नितेश राणे म्हणाले.



बच्चू कडूजींनी थोडं भान ठेवावं


बच्चू कडूंच्या आंदोलनावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली की, सचिन तेंडुलकरसारख्या एका महान खेळाडूला अशा प्रकारच्या विषयांमध्ये ओढू नये. सचिन तेंडुलकरने आपल्या देशाला सन्मान मिळवून दिला आहे. त्यामुळे मी बच्चू कडूजींना सांगेन की सचिन तेंडुलकरविषयी काही आक्षेप असेल तर त्यांनी त्यांच्याशी बोलावं, पण असा खेळाडू परत होणं नाही आणि तो महाराष्ट्राच्या मातीतून तयार झाला आहे. म्हणून आंदोलन कुठे करावं आणि कोणासमोर करावं याचं थोडं भान बच्चू कडूजींनी ठेवावं, असा माझा मैत्रीचा सल्ला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना