Nitesh Rane's letter to ATS : संजय राऊत यांची नार्को टेस्ट करा

  251

नितेश राणे यांचं एटीएसला पत्र


मुंबई : अयोध्येला तयार होणाऱ्या राम मंदिराविषयी (Ayodhya Ram mandir) ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार विरोधी विधाने करत आहेत. यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? असा खडा सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले होते. उद्धव ठाकरेंचा दंगली भडकवण्याचा इतिहास, पुण्यामध्ये दंगली भडकवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांची झालेली चौकशी आणि आताही सातत्याने दंगलींविषयी भाष्य करणं असे अनेक मुद्दे उपस्थित करत उबाठा गटाला त्यांनी चपराक लगावली होती. यानंतर आता पूर्वसूचनेनुसार नितेश राणे यांनी एटीएसला संजय राऊत यांची नार्को टेस्ट करण्याविषयी पत्र पाठवले आहे.


अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी दंगली होणार अशा उबाठा गटाच्या सातत्याच्या वक्तव्यांमुळे नितेश राणे म्हणाले होते की, 'दंगली भडकवण्याची माहिती कुठल्या नागरिकाकडे असेल तर त्याने ती संबंधित पोलीस यंत्रणेला द्यावी, अशी एक जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या अंगावर असते. म्हणून उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडे राम मंदिराकडे जाताना दंगल होणार आहे, यासंबंधी कुठलीही माहिती असेल तर त्यांनी ती त्वरित सरकारी यंत्रणेला द्यायला हवी'.


पुढे ते म्हणाले, मीही स्वतः एटीएसला (ATS) पत्र लिहिणार आहे की, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची सखोल चौकशी करा आणि गरज असेल तर नार्को टेस्ट करा अशी मागणी करणार आहे. त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे ती गोळा करुन अशा पद्धतीचा कोणताही दंगल घडवण्याचा प्रकार होणार असेल, तर तो थांबवण्याची विनंती या पत्राद्वारे मी सरकारला करणार आहे, असं नितेश राणे म्हणाले. त्यानुसार आता नितेश राणे यांनी एटीएस प्रमुख सदानंद दाते यांना पत्र पाठवले आहे.



काय म्हणाले होते नितेश राणे ?


ज्या राम मंदिरासाठी पूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत आहे आणि २०२४ च्या सुरुवातीलाच देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर रामभक्त अयोध्येकडे जाणार आहेत, त्यावर उद्धव ठाकरे व संजय राऊत हे दोघेही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात, रामभक्तांवर हल्ले होऊ शकतात, अशा प्रकारची विधाने करत आहेत. जेव्हा हज यात्रेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जातात, तेव्हा अशा कुठल्याही प्रकारची विधानं ना संजय राऊत करत ना त्याचा मालक उद्धव ठाकरे करत. पण हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आयुष्यामध्ये एक मोठा क्षण राम मंदिराच्या निमित्ताने अनुभवायला मिळत असेल तेव्हाच या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची आहे, असं नितेश राणे म्हणाले होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी