Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

रिटायर व्हा, आता वय झालंय, सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना सल्ला

रिटायर व्हा, आता वय झालंय, सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना सल्ला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) भले २०२४मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाची आघाडी I.N.D.I.A मध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र आणि उद्योगपती सायरस पुनावालाने त्यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारताचे लसीकरणाचचे सम्राट म्हटले जाणारे सायरस पुनावला यांनी मीडियाशी बोलताना चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्त्रोचे कौतुक केले.


यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याबद्दल सवाल केले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार खूप हुशार व्यक्ती आहेत. ते देशाचे मोठी सेवा करू शकत होते. पुनावाला पुढे म्हणाले, आता त्यांचे वय झाले आहे त्यांनी आता निवृत्त झाले पाहिजे.


सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पुनावाला मीडियाशी संवाद साधत होते. एकाएकी जेव्हा एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याबाबत त्यांना सवाल केला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले, त्यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती. जी त्यांनी गमावली. ते एक बुद्धिमान व्यक्ती आहेत ते राष्ट्राची सेवा करू शकत होते. आता त्यांचे वय झाले आहे. त्यांनी आता सेवानिवृत्ती घेतली पाहिजे.


राजकारणात सहा दशकांपेक्षा अधिक वर्षे काम करणाऱ्या शरद पवार यांना गेल्या महिन्यात पुतणे अजित पवार यांच्या टीकेवर त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्यास मनाई केली होती.

Comments
Add Comment