Salman Khan: बॉलिवूडमध्ये ३५ वर्षे पूर्ण, सलमानचा चाहत्यांसाठी खास व्हिडिओ

मुंबई: सलमान खानने (salman khan) सिने इंडस्ट्रीमध्ये ३५ वर्षे पूर्ण केली आहेत. १९८८मध्ये आलेल्या बीवी हो तो ऐसी सिनेमात सहाय्यक भूमिका करणाऱ्या सलमानने त्यानंतर आजतायगत मागे वळून पाहिले नाही. तो देशातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.


आपल्या या दीर्घ यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी सलमान खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याच्या शआनदार करिअरची झलक पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये मैने प्यार किया, हम दिल दे चुके सनम, वाँटेड, दबंग, भारत,टायगर जिंदा है सह अनेक सिनेमांच्या क्लिप्स सामील आहेत. व्हिडिओमध्ये त्याचे काही प्रसिद्ध डायलॉगही ऐकू येत आहेत.


 


सलमान खानने व्हिडिओ कॅप्शनमध्ये आपल्या चाहत्यांसाठी भावूक संदेश लिहिला आहे. त्याने लिहिले ३५ वर्षे ही ३५ दिवसांसारखीच वाटत आहेत. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. सलमान खानचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. कोणी त्याला सुपर भाईजान म्हणत आहेत. तर कोणी लीजेंड खान लिहिले आहे. काही त्यांना बॉलिवूडचा बादशाह म्हणत आहेत. सलमान खानचे जगभरात प्रचंड चाहते आहेत. सलमानच्या आयुष्यात त्यांनी वेळोवेळी साथ दिली आहे.



आगामी सिनेमे


सध्या सलमान खान गेल्या दोन ते अडीच वर्षात खाली आलेला त्याचा करिअर ग्राफ पुन्हा वर चढवण्याच्या प्रयत्नात आहे.नुकताच शाहरूख खानच्या पठान या सिनेमात त्याचा कॅमिओ रोल पाहायला मिळाला होता. याला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती. आता तो टायगर ३मध्ये दिसणार आहे. सिनेमात कतरिना कैफही आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये