Eknath Shinde : आम्ही एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं...

परभणीतून मुख्यमंत्री शिंदे यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र


परभणी : आज परभणी शहरात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी परभणीमध्ये करण्यात येणार्‍या विकासाची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर 'काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले', असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.


'शासन आपल्या दारी' आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम होत असून त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आतापर्यंत २२,००० ट्रॅक्टर्सचं वाटप करण्यात आलं आहे. तर २२,५०० रोटर व्हेटर शेतकऱ्यांना वाटले आणि चार लाख लाभार्थ्यांना १३५१ कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत करण्यात आलं आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.


महिलांबाबतच्या विशेष योजनांबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगटही तयार आहे. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वत:च्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचं काम शासन आता करणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्र सोडलं. "काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. "तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.



खोट्या बातम्या पसरवता पसरवता...


'सरकार पडणार, मुख्यमंत्री बदलणार अशा खोट्या बातम्या सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झालं. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. पण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे.



विरोधकांनी पाटण्यात द्वेषाची खिचडी शिजवली


लोकसभा निवडणूकीत एनडीएला रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची बिहारची राजधानी पाटणा येथे बैठक झाली होती. बैठकीवर हल्ला चढवताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण पाटणापासून (शासन आपल्या दारी) सुरूवात केली. त्यानंतर काही लोक पाटण्यामध्ये जमा झाले आणि तेथे द्वेषाची, स्वार्थाची खिचडी शिजवू लागले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर