Health: संध्याकाळी ७च्या आधी जेवण करणे असते का हेल्दी, घ्या जाणून

मुंबई: कोणत्याही फिटनेसबाबत(fitness) जागरूक असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल की दिवसाच्या शेवटच्या जेवणाची वेळ कधी असावी तर ती व्यक्ती रात्रीचे जेवण (dinner) लवकर करण्याच्या फायद्यांची मोठी यादी तुमच्यासमोर वाचून दाखवेल. २०२०मध्ये करण्यात आलेल्या अभ्यानुसार रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढते आणि ब्लड शुगरचा स्तरही खराब होण्याचा धोका असतो.



रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदे


हेल्थ एक्सपर्टच्या मते रात्रीचे जेवण लवकर केल्याने वजन नियंत्रणात राहते मात्र केवळ जेवणाच्या वेळेच्या आधाराने वजन घटवता येते याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदेही आहेत.


पाचन तंदुरुस्त राहते - जर तुम्ही लवकर जेवत असाल तर तुमच्या जेवणाचे पचन व्यवस्थित होते. अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवणार नाही. तसेच शरीर डिटॉक्सही चांगल्या पद्धतीने होईल.


ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहतो - रात्रीच्या वेळेस जेवण लवकर केल्याने इन्सुलिनची प्रक्रिया योग्य राहते. रात्रीचे जेवण लवकर केल्याने शरीरात हाय ब्लड शुगरचा धोका कमी होतो. यामुळे ग्लायसेमिक नियंत्रणात मदत होते.


चांगली झोप येते - रात्रीच्या वेळेस जेवण लवकर जेवल्याने तुमचे शरीर रात्रीच्या वेळेस आरामाच्या स्थितीत येते यामुळे चांगली झोप येते.


हृदयाचे आरोग्य राहते चांगले - रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. याशिवाय रात्री लवकर जेवण केल्याने चयापचय क्रिया वाढते.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.