जेथे संत, तेथे आनंद व समाधान...


  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर, संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणे जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संताचे दोष दिसणे, म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो; सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहेत, तिथे आनंद आणि समाधान असते, पण तो सामान्य माणसांसारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदान्त आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात, तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते, तर आपल्या पदरात असमाधान पडते. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे.


संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. ‘मी करतो’ हे बंधनाला कारण असते; ते नाहीसे करणे म्हणजे ‘गुरूचे होणे’ समजावे. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो, तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसते इंद्रियदमन हे सर्वस्व मानू नये; ते ज्याच्याकरिता आहे, त्याचे अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे, त्याने काही काळ मुळीच काही करू नये; आणि नंतर भगवंताचे अनुसंधान ठेवायला शिकावे. आपण परीक्षा एकदा नापास झालो, तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचे अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे बरे नाही. देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते.


जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात, त्याचे आपण थोडेतरी आचरण करू या. भगवंताचे अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावे. जिथे भगवंताचे स्मरण तिथे माया नाही. जिथे माया, अभिमान आहे, तिथे भगवंत नाही.


दानाचेही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला, तर तो बुडवील; त्याचे यथायोग्य दान केले, तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो, तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील? संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत. म्हणूनच ते संत झाले, म्हणजेच देवस्वरूप बनले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे

कधी आहे कालभैरव जयंती? महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर

दरवर्षी, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या भगवान कालभैरव

परमेश्वर हाच आपल्या जीवनाचा पाया

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै  परमेश्वर हा विषय समजला नाही, तर हे जग सुखी होणे शक्य नाही, हा जीवनविद्येचा

तणावात जगण्यापेक्षा हसत जगा

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य हल्ली बहुतेक सगळ्यांनाच ताणतणाव असतात. असा माणूस शोधूनही सापडणार नाही ज्याला

भगवान परशुराम

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी  ऋषिश्रेष्ठ परशुरामांना खरी अंतरिक ओढ निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे

माँ नर्मदा... एक अाध्यात्मिक परिक्रमा!

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे भारत हा प्राचीन संस्कृतीचा देश आहे. येथे असंख्य देवी-देवता, झाडे, वनस्पती, प्राणी आणि