कणकवली : यंदा होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये (Teacher recruitment) स्थानिक डी. एड. बेरोजगारांना २०१० प्रमाणे पुन्हा डावलण्यात येईल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे सद्यस्थितीत होणारी भरती ही पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरीय भरती प्रक्रिया असणार आहे. गेली १० वर्षे भरती न झाल्यामुळे येत्या शिक्षक भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी न मिळाल्यास त्यांची वयोमर्यादा संपणार आहे. त्यामुळे पोर्टलमधूनच पूर्वीचे कोकण निवड मंडळ स्थापन करून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक डी. एड. बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेऊन करण्यात आली.
स्थानिक डी. एड. बेरोजगारांनी २७ मार्चपासून केलेल्या १४ दिवसांच्या उपोषणाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन न्याय मिळवून देणार, म्हणून आश्वासित केले होते. जूनपासून शाळा सूरू होऊन पाच महिने झाले, तरी काही शाळांना शिक्षक मिळाले नाही. स्थानिकांना त्या शाळेत शिक्षक म्हणून संधी द्यावी, यासाठी प्रयत्न झाले; पण स्थानिकांवर प्रशासनाने पूर्ण दुर्लक्ष केले. त्यावर लक्ष वेधण्यासाठी व मागील आश्वासनाचा पाठपुरावा करण्यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री नारायण राणे यांची कणकवली येथे नुकतीच भेट घेतली.
जिल्ह्यातील डी. एड. बेरोजगारांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. याबाबत येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व सचिवांची मंत्रालय पातळीवर एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढू, असा शब्द मंत्री नारायण राणे यांनी दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, भाजप दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, अजय परब, समीर ठाकूर आदी उपस्थित होते.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…