Ajit Pawar's NCP : फोटो वापरायला शरद पवारांनी नकार दिला असला तरीही अजितदादांच्या गटाला मिळतंय आणखी बळ...

सातार्‍यातही जयंत पाटलांच्या समर्थकांची अजित पवारांच्या बैठकीला उपस्थिती


बीड : डॉ. योगेश क्षीरसागर (Dr. Yogesh Kshirsagar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar's NCP) गटात बुधवारी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्षीरसागरांचा प्रवेश झाला. क्षीरसागर यांच्या कार्यक्रमावेळी फ्लेक्सवर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो नसल्यानं माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना मिळाल्याचं समोर येत आहे. बीडमधील सभेच्या टिझरमध्ये देखील शरद पवारांचा फोटो वापरणं टाळण्यात आलं होतं.


अजित पवार गटाने बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं कारण म्हणजे 'फोटो वापराल तर कोर्टात खेचेन' असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर किंवा इतरत्र कोठे न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. असं असलं तरी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशामुळे बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे.


अजित पवार यांनी योगेश क्षीरसागरांच्या पक्षप्रवेशावेळी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडसाठी नवे संकेतही दिले. मी आणि माझ्या समर्थकांनी विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला, असं क्षीरसागर यावेळी म्हणाले. शिवाय अजित पवार यांनी काल सातारा येथे बोलावलेल्या बैठकीलाही शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत जाणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. तासगावातून प्रताप पाटील यांच्यासह तासगाव तालुक्यातील काही नेते आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Nagpur Crime : लॉजवर घेऊन गेला अन् 30 तास हात पाय बांधून नको ते केलं, नागपूर पोलिसांकडून आरोपीला अटक

नागपूर : नागपुरात (Nagpur) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि गंभीर अत्याचाराच्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली

Jalgaon : जळगावकरांनो लक्ष द्या ! शिव कॉलनी पुलाच्या कामासाठी वाहतूक वळवणार; 'हे' असतील पर्यायी मार्ग

Jalgaon : जळगाव शहरातील शिव कॉलनीतील रेल्वे मार्गावरील समांतर पूल आणि भुयारी मार्गाच्या रखडलेल्या कामाला अखेर गती

State Government : आयुष्यमान भारत आणि जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहारांप्रकरणी एसआयटी

 १५ हजार ४०७ उपचारांचे दावे संशयास्पद; महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई : आयुष्मान भारत-पंतप्रधान

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :