बीड : डॉ. योगेश क्षीरसागर (Dr. Yogesh Kshirsagar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar’s NCP) गटात बुधवारी प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत क्षीरसागरांचा प्रवेश झाला. क्षीरसागर यांच्या कार्यक्रमावेळी फ्लेक्सवर शरद पवारांचा (Sharad Pawar) फोटो नसल्यानं माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांचा फोटो फ्लेक्सवर न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना मिळाल्याचं समोर येत आहे. बीडमधील सभेच्या टिझरमध्ये देखील शरद पवारांचा फोटो वापरणं टाळण्यात आलं होतं.
अजित पवार गटाने बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं कारण म्हणजे ‘फोटो वापराल तर कोर्टात खेचेन’ असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर किंवा इतरत्र कोठे न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. असं असलं तरी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशामुळे बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणखी बळ मिळणार आहे.
अजित पवार यांनी योगेश क्षीरसागरांच्या पक्षप्रवेशावेळी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडसाठी नवे संकेतही दिले. मी आणि माझ्या समर्थकांनी विश्वास टाकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला, असं क्षीरसागर यावेळी म्हणाले. शिवाय अजित पवार यांनी काल सातारा येथे बोलावलेल्या बैठकीलाही शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे हे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत जाणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. तासगावातून प्रताप पाटील यांच्यासह तासगाव तालुक्यातील काही नेते आणि पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते अजित पवार गटात जाणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…