मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपला साथ दिल्याच्या घटनेला वर्ष पूर्ण झाले असून या घटनेची राष्ट्रवादी पक्षाकडून पुनरावृत्तीही झाली. मुख्यमंत्री व त्यांच्यासोबत बंड केलेल्या १६ आमदारांविरुद्ध ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लावला असला तरी १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय मात्र विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या निकालाला दोन महिने उलटून गेल्यानंतरही अजून निकाल लागलेला नाही. त्यातच आणखी वर्षभराने विधानसभेची निवडणूकही लागणार आहे, त्यामुळे हा निकाल कधी लावणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे.
या संदर्भात निकाल लावण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) सुरुवातीला शिवसेनेची घटना अभ्यासणार असल्याचे सांगत होते, परंतु, दोन महिन्यांनंतरही उत्तर न मिळाल्याने ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर नार्वेकरांनी दोन्ही गटांकडून उत्तर मागविले होते. ठाकरे गटाने २६२ पानी उत्तर १८ जुलैला दिलं होतं. तर शिंदे गटाने वेळ वाढवून मागितली होती.
यानंतर आता शिंदे गटाने सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. आता एवढ्या पानांचा अभ्यास कधी करणार असा सवालही राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यावर सुनावणीला कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि योग्य प्रकारे निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. त्यामुळे हा निकाल नक्की कधी व कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…