Ind vs Ire: भारत वि आयर्लंड तिसरा सामना रद्द, भारताने मालिका २-०ने जिंकली

डबलिन: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना आज रंगणार होता. मात्र सुरूवातीपासूनच पावसाने खोडा घातला.


पावसामुळे टॉस उशिराने होणार असे सांगण्यात आले मात्र पाऊस काही थांबण्यास तयार नव्हता. अखेर दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला आहे. भारताने या मालिकेतील दोन सामने आधीच खिशात घातले आहेत. त्यामुळे भारताने तीन सामन्यांची ही मालिका २-० अशी जिंकली आहे.


जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयर्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यात भारताच्या संघाने जबरदस्त कामगिरी करत मालिकेत विजय मिळवले होते.


आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी जिंकला होता. त्यानंतरच्या दुसऱ्या सामन्यात भारताने एकहाती विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताने १८६ धावांचे आव्हान आयर्लंडसमोर दिले होते मात्र आयर्लंडने झुंज देत १५२ धावा केल्या.

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)