Saturday, May 10, 2025

देशताज्या घडामोडी

G-20: दिल्लीत ८ ते १० सप्टेंबरदरम्यान शाळा-कॉलेजेस, ऑफिस, बाजार राहणार बंद

G-20: दिल्लीत ८ ते १० सप्टेंबरदरम्यान शाळा-कॉलेजेस, ऑफिस, बाजार राहणार बंद

नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखालील जी२० परिषदेचे (G 20 summit) आयोजन नवी दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या नवनिर्मित स्टेट ऑफ आर्ट कंर्वेशन कॉम्प्लेक्समध्ये ९ आणि १० सप्टेंबरला करण्यात आले आहे. या परिषदेच्या दृष्टीने दिल्लीत मोठ्या प्रमाणात व्हीआयपी हालचाली होत आहे.


ही परिषद पाहता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने (kejriwal government) मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली सरकारने ८ ते १० सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. हे तीन दिवस दिल्लीचे सर्व सरकारी कार्यालये, मॉल्स आणि मार्केट बंद असतील. तसेच सर्व शाळा-कॉलेजना ३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


जी-२० परिषदेसाठी दिल्ली पोलिसांनी ८ ते १० सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी शिफारस केली होती. यानंतर दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आदेशानंतर नवी दिल्ली जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या बँक तसेच आर्थिक संस्था तीन दिवस बंद राहणार आहेत. दिल्ली सरकार आणि एमसीडीचे सर्व कार्यालही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


दरम्यान, काही शाळा तसेच कॉलेजेस ऑनलाईन पद्धतीने सुरू राहू शकतात. याशिवाय काही कार्यालयांना ८ ते १० सप्टेंबरदरम्यान वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले जाऊ शकते. याशिवाय मॉल्स तसेच दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



मेट्रो सेवा सुरू राहणार


दरम्यान, या काळात मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. तसेच जी २० परिषदेदरम्यान येण्याजाण्यासाठी रस्ते मार्गाचा वापर करण्याऐवजी मेट्रोचा वापर करा असे अपील पोलिसांकडून करण्यात आले आहे. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, रुग्णालय या ठिकाणी जाण्यासाठी अधिकाधिक मेट्रोचा वापर करण्याचा सल्ला दिला गेला आहे.



हे मेट्रो स्टेशन राहू शकतात बंद


दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने ८ ते १० सप्टेंबरदरम्यान सुप्रीम कोर्ट, खान मार्केट, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय हे मेट्रो स्टेशन बंद राहू शकतात.



हे देश आहेत जी २० चे सदस्य


जी २० मध्ये संयुक्त राष्ट्र अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारत, इंडोनेशिया, रशियात,टर्की, फ्रान्स, जर्मनी, इटली, युके, सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश आहे.

Comments
Add Comment