जोहान्सबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) मंगळवारी सांगितले की आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (economy) आहे आणि लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे. ते दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स (brics business forum leaders) चर्चेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या घडीला कोरोना महामारी, तणाव आणि वादांमध्ये संपूर्ण जग हे आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. अशा वेळेस ब्रिक्स देशांची महत्त्वपूर्ण आहे. जागतिक स्तरावर इतकी उलथापालथ होत असताना भारत आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्र्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनणार आहे.
#WATCH | Today, India is the fastest-growing major economy in the world. Soon, India will be a 5 trillion dollar economy: PM Modi at BRICS Business Forum Leaders’ Dialogue in Johannesburg, South Africa pic.twitter.com/XWuOPOAfTz
— ANI (@ANI) August 22, 2023
आगामी काळात भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन बनेल. कारण भारताने आपात्कालीन तसेच कठीण काळाला आर्थिक सुधारणेच्या संधीमध्ये रूपांतरित केले आहे. आज भारतात एका क्लिकने कोट्यावधी लोकांना डायरेक्ट बेनिटिफ ट्रान्सफर केले जातात.
पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करताना सांगितले, गेल्या ९ वर्षआंत लोकांचे उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. यासोबतच भारताच्या आर्थिक विकासात महिलांचे योदान अधिक आहे. भारताकडे जगातील तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप पारिस्थितीकी तंत्र आहे. देशात १००हून अधिक युनिकॉर्न आहेत.