मुंबई : सीबीआयने मुंबईमधील वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Varun Industries Ltd) संचालकांविरुद्ध दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची ३८८.१७ कोटी रुपयांची फसवणूक (fraud) केल्याबद्दल दोन स्वतंत्र एफआयआर (FIR) नोंदवले आहेत. वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासह अन्य दोन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदार ही केंद्रीकृत बँक असून आरोपींनी बँकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पहिल्या प्रकरणात २६९ कोटी रुपयांची फसवणूक आणि दुसऱ्या प्रकरणात ११८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण ३८८.१७ कोटी रुपयांची फसवणूक वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडने केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
सीबीआयने (CBI) बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ मध्ये वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडच्या दोन कंपन्या एक वरुण ज्वेल आणि दुसरी ट्रायमॅक्स डेटा सेंटरची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात आली होती. बँकेच्या फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात ही चौकशी करण्यात आली होती. वरुण ज्वेलने पीएनबीकडून कर्ज घेऊन त्यांच्या खात्यात ४६ कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यानंतर वरुण ज्वेलचे खाते एनपीए झाले आहे.
कंपनीचं खाते एनपीए झाल्यानंतर पीएनबीला ६३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने पीएनबीकडून कर्ज घेऊन ८ कोटी रुपये मॉरिशसमधील सहाय्यक कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.
तर वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी ट्रायमॅक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेसशी संलग्न असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटर सर्व्हिसेसने २०१४ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रकडून २९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते आणि अनेकांना पैसे हस्तांतरित केले होते.
त्यानंतर कंपनीनं इतर अनेक बँक खात्यांमधून पैसे काढले आणि राउटिंग सेलद्वारे होल्डिंग कंपनीच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले. अशा परिस्थितीत २०१८ मध्ये त्याचे खाते एनपीए झाले. ट्रायमॅक्स आयटीने १९० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून निधीचा गैरवापर केला आणि त्यांचे खाते २०१७ मध्ये एनपीए झाल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर सीबीआयने वरुण इंडस्ट्रीजविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…