Salman Khan: व्हायरल झाला सलमान खानचा 'गजनी' लूक

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (salman khan) देशातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आठवडाभरआधीच १४ ऑगस्टला त्याने बिग बॉस ओटीटी २चे शूटिंग संपवले आहे. त्यानंतर आता तो आपल्या सिनेमांकडे परतला आहे. त्याने आपल्या उरलेल्या सिनेमांचे शूटिंग सुरू केले आहे.


काही कार्यक्रमादरम्यानही सलमान दिसला होता. नुकतेच त्याला एका डिनर पार्टीत स्पॉट केले गेले. या दरम्यान त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. त्याचे फॅन तर त्याचा हा लूक पाहून हैराणच झालेत.


सलमान नेहमी आपल्या वेगवेगळ्या स्टाईलबाजीसाठी ओळखला जातो. तो ज्या सिनेमात काम करतो त्याच लूकमध्ये असतो. प्रत्येकजण त्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. त्याची 'तेरे नाम' या सिनेमातील हेअरस्टाईलही आजही चर्चेत आहे. आताही सलमान खानच्या केसांचा लूक असाच काहीसा वेगळा आहे. त्याचा या लूकचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल होत आहे.



सलमानचा नवा लूक


व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जेव्हा सलमान कारमधून उतरतो तेव्हा तेव्हा काळा शर्ट, काळी पँट आणि काळे शूज घातले आहेत. अनेकदा तो असा कॅज्युएल लूकमध्ये दिसतो. याशिवाय त्याने ब्रेसलेटही घातले होते. मात्र त्याने केस कापले होते. त्याचा लूक पाहून नक्कीच अनेकांना गजनीची आठवण आली आहे.


 


दरम्यान, त्याचा हा लूक पाहून अनेकजण टायगर ३ साठी त्याने असा लूक केला असावा असा अंदाज बांधत आहेत. मात्र याची माहिती अद्याप मिळालेली नाही.


याआधी २००३मध्ये आलेला सिनेमा तेरे नाम मध्ये सलमान खानने केस पूर्ण कापले होते. तो टकला झाला होता. सलमान खानच्या या बाल्ड लूकच्या चर्चा त्यावेळेसही रंगल्या होत्या. या सिनेमात सलमानसोबत भूमिका चावला होती.

Comments
Add Comment

Girija Oak Godbole : निळ्या साडीतील गिरिजा ओक बनली 'नॅशनल क्रश'! सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एक्स (X),

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

मुंबई: अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज

बॉलीवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती स्थिर

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. मात्र यावेळी

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

Gautami Patil : नृत्य नाही, आता शौर्य! गौतमी पाटीलचं 'नऊवारी' गाणं रेकॉर्ड ब्रेक, चाहत्यांकडून तुफान लाईक्स

मुंबई : आपल्या दमदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या