नवी दिल्ली: दिल्ली सरकारच्या (delhi government) महिला आणि बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याला एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या (rape) आरोपावरून सोमवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी त्याची पत्नी सीमा राणीलाही अटक (arrest) करण्यात आली.
महिला आणि बाल विकास विभागात वरिष्ठ पदावर तैनात असलेल्या परमोदयवर आपल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुन्ह्याच्या वेळेस अल्पवयीन मुलीचे वय १४ वर्षे होते मात्र आता तिचे वय १७ वर्षे आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीवर मुलीवर जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप आहे.
केजरीवालांकडून निलंबनाचे आदेश
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आदेशानंतर आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी १२वीची विद्यार्थिनी आहे. एक ऑक्टोबर २०२०मध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले होते त्यानंतर ती आरोपीच्या कुटुंबियांसोबत राहत होती. परमोदय खाका महिला आणि बाल विकास मंत्रालया उपसंचालक पदावर कार्यरत होते. ही मुलगी आरोपीला मामा म्हणत असे. आरोपीने नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान मुलीवर अनेकदा बलात्कार केले. त्यावेळेस त्या मुलीचे वय १४ वर्षे होते.
दिल्ली पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीवर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंसेंज(पॉक्सो) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेवर मुलीला गर्भपाताची गोळी देण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डीसीपी सागर सिंहच्या विधानानुसार आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर ती ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत आरोपीच्या कुटुंबियांसोबत राहत होती. मात्र तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आले.तिचा लैंगिक छळ करण्यात आला. यामुळे तिला अनेकदा पॅनिक अॅटॅकही आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात मुलीच्या कौन्सिलिंगनंतर डॉक्टरांना तिने हे घडलेले कृत्य सांगितले.