Crime: कल्याणमध्ये डान्स टीचरकडून ५ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये (kalyan) गुन्हेगारीच्या (crime) घटना काही कमी होत नाही आहेत. काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीच्या हत्येने कल्याण हादरले होते. या घटनेला थोडेच दिवस होत नाहीत तर आणखी एक धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे.


कल्याणमधील एका शाळेत ५ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हे कृत्य त्या शाळेतील डान्स टीचरने केले असून या प्रकरणात आरोपी टीचरला कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.


कल्याण पूर्व येथील एका शाळेत शिकत असलेल्या ५ वर्षीय मुलाने जेव्हा लैंगिक अत्याचाराची घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ही घटना शुक्रवारी घडली होती. या डान्स टीचरने मुलासोबत शाळेतील शौचालयात लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता.


शनिवारी आणि रविवारी शाळा बंद असल्याने पीडित मुलाचे आईवडील सोमवारी शाळेत गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार त्यांनी सांगितला. त्यानंतर तातडीने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी डान्स टीचरला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.


दरम्यान, कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे मोठे आव्हान कल्याण पोलिसांसमोर आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

पुणे महापालिका निवडणुकीत अनपेक्षित निकाल आंदेकर; प्रभाग २३ मध्ये धंगेकरांना धक्का

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मधून एक वेगळाच राजकीय निकाल समोर आला आहे. नाना पेठ आणि

Pune Andekar Family : सूनेनंतर सासूनेही मारलं मैदान ! पुण्यात लक्ष्मी आंदेकरचा थरारक विजय

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २३ मध्ये चुरस पाहायला मिळाली. या निवडणुकीत सूनेनंतर आता

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या