IND vs IRE : ही मोठी डोकेदुखी आहे, विजयानंतरही असं का म्हणाला बुमराह

  191

डबलिन: आयर्लंड (ireland) आणि भारत (india) यांच्यात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने (team india) अतिशय सहजपणे ३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने या ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये आधी फलंदाजांनी तर नंतर गोलंदाजांनी कमाल केली.


जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या. यानंतर आयर्लंडच्या डावाला १५२ धावांवर रोखले. यासोबतच टीम इंडियाने या सामन्यात ३३ धावांनी विजय मिळवला. या मोठ्या विजयानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही मोठे विधान केले आहे.



ही सगळ्यात मोठी डोकेदुखी


आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणाऱ्या जसप्रीत बुमराहने त्याच्यासाठी कोणती गोष्ट सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे याचा खुलासा केला. त्याने सांगितले सगळ्यात कठीण आहे अंतिम ११ची निवड करणे.


विजयानंतर बुमराह म्हणाला, मला चांगले वाटत आहे. हे खूपच शानदार आहे. मात्र सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे अंतिम ११ची निवड करणे. सगळेच उत्सुक आहेत. सगळ्यांचा आत्मविश्वास प्रचंड आङे. आम्हाला सगळ्यांनाच भारतासाठी खेळायचे आहे. अखेर सगळ्यांनाच आपापल्या पद्धतीने काम करावे लागेल. जर तुम्ही अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून खेळता तर तुम्ही दबावात आहात. तुम्हाला त्या अपेक्षा एका बाजूला ठेवाव्या लागतील. जर तुम्ही इतक्या अपेक्षांसोबत खेळत आहात तर तुम्ही १०० टक्के स्वत:ला न्याय देऊ शकत नाही.



दुसऱ्या टी-२०मध्ये बुमराहची जादू


पहिल्या सामन्यात दोन विकेट घेत बुमराहने शानदार कमबॅक केले. दुसऱ्या टी-२० सामन्यातही त्याचा जलवा पाहायला मिळाला. बुमराहने चार ओव्हरमध्ये १५ धावा देत २ विकेट मिळवल्या. बुमराह सध्या फॉर्ममध्ये दिसत आहे. तो आशिया कप आणि वर्ल्डकपमध्ये भारताचा महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक असेल.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब