Monday, July 22, 2024
Homeमहत्वाची बातमीCongress split : आता काँग्रेसही फुटणार? काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होणार!

Congress split : आता काँग्रेसही फुटणार? काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होणार!

शिंदे गटातील खासदाराचा दावा

बुलढाणा : वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता केल्याने काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत खदखद व्यक्त केली जात असून काँग्रेस आमदारांचा मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आधी शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena Shinde Group), नंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (NCP Ajit Pawar Group) यांनी बंड केल्याने प्रचंड उलथापालथ सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडणार असल्याचा दावा जाधव यांनी केल्याने राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे.

खासदार प्रतापराव जाधव यांच्या दाव्यानुसार, विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेसमधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून महायुतीमध्ये काँग्रेसचे अनेक नेते सहभागी होणार आहेत.

विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलून वडेट्टीवार यांच्यासारख्या ज्युनिअर नेत्याला विरोधी पक्ष नेते पद दिल्यामुळे काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांची नावे घेण्याची गरज नाही, त्यांच्याबाबत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तसेच, योग्य आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ही सर्व मंडळी आहेत.

याआधी शिवसेनेचा एक मोठा गट महायुतीमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा गट महायुतीमध्ये सहभागील झाला. आता काँग्रेसचाही मोठा गट महायुतीत सहभागी होण्याच्या मार्गावर असून लवकरच सर्वपक्षीय सरकार येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भाष्य केले आहे.

काँग्रेसचे अनेक नेते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. आता नेमका आकडा मला माहिती नाही. पण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार आहे, असा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -