Chandrayaan-3: 'चांद्रयान ३' कडून मिळाली आहे ही खुशखबर

नवी दिल्ली: भारताची 'चांद्रयान ३' मोहीम (chandrayaan 3 mission) चंद्राच्या दिशेने पुढेपुढे सरकत आहे. त्यातच आता चांद्रयान ३ कडून आणखी एक खुशखबर मिळाली आहे. १७ ऑगस्ट २०२३ला जे प्रोपल्शन मॉड्यूल(propulsion module) विक्रम लँडरपासून वेगळे झाले होते. त्याचे जीवन ३ ते ६ महिने सांगितले जात होते. मात्र हे मॉड्यूल आता अनेक वर्षे काम करत राहणार आहे. इस्रोने असा दावा केला आहे.


इस्रोची चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होण्यास काही तास शिल्लक आहेत. तीन दिवसांत विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. मात्र हे लँडर तीन दिवस आधीच प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले होते. १७ ऑगस्टला चांद्रयान ३चे दोन भाग झाले होते.


प्रोपल्शन मॉड्यूलला सोडून विक्रम लँडर पुढच्या रस्त्यावर निघाला होता. इस्रोचे माजी वैज्ञानिक विनोद कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की जेव्हा चांद्रयान ३ लाँच झाले होते तेव्हा प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये १६९६.४ किग्रॅ इंधन होते. यानंतर प्रोपल्शन मॉड्यूलच्या मदतीने पृथ्वीच्या चारही बाजूंनी पाच वेळा कक्षा बदलली. हे इंजिन सहा वेळा सुरू करण्यात आले होते.


यानंतर चांद्रयान ३ चंद्राच्या हायवेवर आले. त्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सहा वेळा प्रोपल्शन मॉड्यूलचे इंजिन सुरू करण्यात आले. एकूण मिळून १५४६ किग्रॅ संपले. म्हणजेच आता यामध्ये १५० किग्रॅ इंधन बाकी आहे. म्हणजेच हे प्रोपल्शन मॉड्यूल ३ ते ६ महिने नव्हे तर अनेक वर्षांपर्यंत काम करू शकते.


याला इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनीही दुजोरा दिला. ते म्हणाले की आमच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त इंधन शिल्लक आहे. जर सगळं काही सुरळीत झालं आणि जास्त त्रास झाला नाही तर प्रोपल्शन मॉड्यूल अनेक वर्षांपर्यंत काम करू शकते. हे सर्न चंद्राच्या चारही बाजूंच्या कक्षेच्या करेक्शनवर अवलंबून आहे.



२३ ऑगस्टला लँडिंग


येत्या २३ ऑगस्टला चांद्रयान ३ चे लँडिंग होणार आहे. याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही २३ ऑगस्ट २०२३ला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून पाहू शकता.

Comments
Add Comment

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०

राजस्थानच्या गौरवशाली इतिहासाची गाथा सांगणार जयपूर विधानसभेतील डिजिटल संग्रहालय

जयपूर : संपूर्ण विधानसभेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आता डिजीटल पद्धतीचा वापर जयपूर विधानसभेत होणार आहे.

प्रयागराजमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यावर बनवणार पब्लिक प्लाझा पार्क

प्रयागराज : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने महाकुंभ २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे यमुना

‘अल फलाह’वर गुन्हे शाखेची कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली स्फोट प्रकरणात फरिदाबादमधील अल फलाह युनिव्हर्सिटीही आरोपांच्या घेऱ्यात आहे. आहे. विद्यापीठ