Sunday, July 21, 2024
Homeदेशमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर अखिलेश यादवना भेटले रजनीकांत, चर्चेला उधाण

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर अखिलेश यादवना भेटले रजनीकांत, चर्चेला उधाण

नवी दिल्ली: मेगास्टार रजनीकांत (Rajnikanth) यांनी रविवारी लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (akhilesh yadav) यांची भेट घेतली. याआधी शनिवारी संध्याकाळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटले होते. अभिनेता रजनीकांत अखिलेश यांच्या घरी जाऊन भेटले. अखिलेशने त्यांच्यासोबत फोटो शेअर केला आहे.

नुकताच रजनीकांत यांचा जेलर हा सिनेमा रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. कमाईच्या बाबतीत त्याने पीएस २ आणि इतर सिनेमांचे रेकॉर्डही तोडले आहेत.

जेलरच्या यशाने रजनीकांत खूप खूश आहे मात्र त्यांचे चाहते नाराज दिसत आहेत. याचे कारण आहे व्हिडिओ ज्यात रजनीकांत सीएम योगी आदित्यनाथ यांना भेटले आणि जेलर सिनेमा पाहण्यास सांगितला. तसेच या दरम्यान ते योगी आदित्यनाथ यांच्या पायाही पडले. काही युजर्सनी म्हटले की योगी आदित्यनाथ वयाने रजनीकांतपेक्षा लहान आहेत. यासाठी रजनीकांतचे चाहते नाराज आहेत.

अखिलेश यांना भेटून रजनीकांत म्हणाले,, मी नऊ वर्षांपूर्वी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान अखिलेश यादव यांना भेटलो होो तेव्हा पासून आम्ही दोघे मित्र आहोत. आम्ही फोनवर बोलत असतो. पाच वर्षांपूर्वी मी येथे शूटिंगसाठी आलो होतो मात्र तेव्हा भेट होऊ शकली नाही. आता ते इथे आहेत तर मी त्यांना भेटलो.

 

जेलरचा धुमाकूळ

रजनीकांत यांनी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवला आहे. जेलर सिनेमा १० ऑगस्टला रिलीज झाला होता. गदरच्या एक दिवस आधी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाने धमाकेदार सुरूवात केली आणि जगभरात या सिनेमाने ९० कोटींहून अधिक कमाई केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -