लेह: लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला दुर्देवी अपघात झाला. लडाखच्या लेह जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने झालेल्या अपघतात ९ जवान शहीद झालेत. तर यात एक जवान जखमी झाला आहे. लडाखच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला. ही दुर्घटना दक्षिण लडाखच्या न्योमामधल केरे येथे झाले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य करण्यात आले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्घटनेप्रकरणी शोक व्यक्त केला आहे आणि ट्वीट करत लडाखच्या लेह येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद जवानांच्या मृत्यूप्रकरणी शोक व्यक्त केला. देशासाठी त्यांनी केलेली सेवा नेहमीच लक्षात राहील. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबाप्रती कायम आहे. जखमी जवानांना फिल्ड रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते ही लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आशा करतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमार कियारी येथन ७ किमी आधी दरीत वाहन कोसळले. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्कराचे हे वाहन कारू गॅरीसन येथून लेह जवळील क्यारी येथे जात होते. या वाहनात एकूण १० जवान प्रवास करत होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…