Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाभारताची मालिकेत विजयी आघाडी, दुसऱ्या टी-२०मध्ये आयर्लंडविरुद्ध ३३ धावांनी विजय

भारताची मालिकेत विजयी आघाडी, दुसऱ्या टी-२०मध्ये आयर्लंडविरुद्ध ३३ धावांनी विजय

डबलिन : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ३३ धावांनी बाजी मारली. य़ा विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५ बाद १८५ धावा केल्या होत्या.

भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने ५८ धावांची जबरदस्त खेळी केली. तर संजू सॅमसनने ४० धावांची खेळी केली. रिंकू सिंह यानेही ३८ धावा केल्या. तर शिवम दुबेने २२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या चारही खेळाडूंच्या धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद १८५ धावा केल्या. आयर्लंडला विजयासाठी १८६ धावांचे आव्हान मिळाले.

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी झाली. यशस्वी जयसवालने ११ बॉलमध्ये १८ धावा केल्या. तिलक वर्मा पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. त्याला केवळ एक धाव करता आली. यानंतर संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड यांनी डाव सांभाळला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसनने २६ बॉलमध्ये ४० धावांची खेळई केली. यातच ऋतुराजने ३९ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

दरम्यान, अर्धशतकानंतर तो ५८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शिवम आण रिंकू सिंह संघर्ष करत होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये चांगलीच धुलाई केली. रिंकू सिंह २१ बॉलमध्ये ३८ धावा करून बाद झाला. शिवम १६ बॉलमध्ये २२ धावा करत नाबाद राहिला.

दुसरीकडे, आयर्लंडने भारताला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. मात्र आयर्लंडला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. आयर्लंडकडून सलामीवीर अँडी बालबिर्नीने जबरदस्त ७२ धावांची खेळी केली. तर मार्क अडायरने २३ धावांची खेळी केली. बाकी इतर कोणाला चांगली खेळी करता आली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -