टोमॅटोनंतर कांद्याचे दर वाढण्याची भीती, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई: दराची शंभरी पार केलेले टोमॅटो(tomato) आता कुठे कमी होत आहेत. टोमॅटोचे दर बाजारात कमी झाले आहेत. यातच कांद्याच्या दरांनीही(onion rate) सर्वसामन्यांना रडवू नये यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टोमॅटोप्रमाणे कांद्याचे दर वाढू नयेत यासाठी सरकार आधीपासूनच पावले उचलत आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. म्हणजेच कांदा परदेशात विकायचा असेल तर विक्रेत्याला ४० टक्के शुल्क सरकारला द्यावे लागेल.



निर्यात शुल्क ४० टक्के


सरकारने कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधीच मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत लागू असेल.


 


खरंतर, गेल्या आठवड्यात सरकारने ऑक्टोबरमध्ये नवे पीक येईपर्यंत किंमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने विशिष्ट क्षेत्रांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून कांदा बाजारात उतरवण्याची घोषणा केली होती. सरकार कांदा वितरणासाठी विविध पर्याय शोधत आहे. यात ई लिलाव, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ग्राहक सहकारी समिती तसेच नगरपालिकांकडून चालवल्या जाणाऱ्या दुकानांच्या माध्यमातून सूट देण्यासाठी राज्य अधिकाऱ्यांशी करार या मार्गाचा वापर केला जात आहे.



कांद्याच्या किंमतीत वाढ सुरू


बाजारात कांद्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. सध्या बाजारात ३० ते ३५ रूपये किलो दराने कांदा उफलब्ध आहे. किंमती कमी करण्यासाठी सरकारने काही दिवसांआधीच बफर स्टॉक बाजारात आणला होता. खराब दर्जाच्या कांद्याचे मोठे प्रमाण, टोमॅटोसह इतर भाज्यांच्या वाढत्या किंमती, पूर तसेच मुसळधा पाऊस ही अनेक कारणे कांद्याच्या किंमती वाढण्यास कारणीभूत आहेत.

Comments
Add Comment

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र

‘जेन-झी’वर माझा विश्वास : पंतप्रधान मोदी

भारताचा ‘विकसित राष्ट्राचा’ निर्धार याच मुलांच्या हाती नवी दिल्ली : जेन-झी पिढीच्या मुलांवर माझा विश्वास असून,

चीनच्या उत्पादनांवर ‘अँटी-डंपिंग’ शुल्क

केंद्र सरकारचा धाडसी निर्णय नवी दिल्ली : देशातील स्थानिक उद्योगांना बळ देण्यासाठी आणि 'ईज ऑफ डूइंग बिझनेस'ला