'बाईपण भारी देवा'चे थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण, बजेटपेक्षा १५ पट अधिक कमावले

मुंबई: ५० दिवसांपूर्वी थिएटरमध्ये केदार शिंदे (kedar shinde) दिग्दर्शित बाईपण भारी देवा (baipan bhari deva) हा सिनेमा आला. ना मोठी स्टारकास्ट ना खूप काही बजेट. मात्र गेल्या ५० दिवसांपासून हा सिनेमा थिएटरमध्ये दणक्यात सुरू आहे. या सिनेमाने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली आहे. या सिनेमाने तब्बल ७५ कोटींचा टप्पा पार केला आहे.


सध्याच्या काळात छोट्या बजेटचे सामने १५ दिवसही थिएटरमध्ये टिकू शकत नाहीत. मात्र बाईपण भारी देवा हा सिनेमा गेल्या ५० दिवसांपासून थिएटरमध्ये मोठ्या गर्दीत सुरू आहे. हा सिनेमा ६ बायकांची कहाणी सांगणार आहे. यात कोणताही पुरुष अभिनेता मुख्य भूमिकेत नाही. बायकांना आपला असा वाटणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे सातव्या आठवड्यातील आकडेवारी समोर आली आहे.



बजेटच्या तुलनेत १५ पट अधिक कमाई


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने या सिनेमाच्या ७व्या आठवड्याचे कलेक्शन शेअर केले आहेत. सोबतच हा सिनेमा ऑल टाईम ब्लॉकबस्टर असल्याचे सांगितले आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या आठवड्यात २४.८५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात २१.२४ कोटी, चौथ्या आठवड्यात ९.७२ कोटी, पाचव्या आठवड्यात ४.१४ कोटी, सहाव्या आठवड्यात २.२५ कोटी आणि सातव्या आठवड्यात सिनेमाने १.३५ कोटींची कमाई केली आहे. यासोबतच या सिनेमाने आतापर्यंत ७६.०५ कोटींची कमाई केली आहे.


 


किती होते सिनेमाचे बजेट


या सिनेमाच्या बजेटबाबत बोलायचे झाल्यास केवळ ५ कोटींमध्ये हा सिनेमा बनला होता. या सिनेमाने आतापर्यंत बजेटच्या १५ पट अधिक कमाई केली आहे.
Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं