Tadoba Andhari wildlife sanctuary : ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट! तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक

सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीविरोधात गुन्हा दाखल... नेमके प्रकरण काय?


चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासंदर्भात (Tadoba Andhari wildlife sanctuary) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाला सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीने सुमारे १२ कोटी १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन (Wild connectivity Solutions) या सफारी बुकिंग करणार्‍या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


करारनाम्यानुसार तीन वर्षांमध्ये एकूण २२,८०,६७,००० देय रकमेपैकी केवळ १०,६५,००,००० रकमेचा भरणा या एजन्सीने केला आहे. तर उर्वरित १२ कोटी १५ लाख रुपयांसाठी वारंवार पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. त्यामुळे एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.



नेमके प्रकरण काय?


'वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स' या कंपनीकडे गेल्या तीन वर्षांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगचे सर्व हक्क देण्यात आले होते. या कंपनीने बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करुन, अनेक प्रकारचे गैरव्यवहार करुन या प्रकल्पात चुकीच्या पद्धतीने बुकींग्ज केले, अशी शंका ताडोबाच्या अधिकार्‍यांना होती. त्यामुळे जुलै महिन्यापासून या कंपनीसोबतचं कंत्राट संपवण्यात आलं होतं.


मात्र त्यानंतर कंपनीबद्दलच्या गैरव्यवहारांची शंका अधिक बळावत गेली. ताडोबाच्या इतिहासात पहिल्यांदाच जिप्सी चालक आणि गाइड्स यांचाही दीड ते दोन महिने उलटून गेले तरीही पगार झाला नाही. यासंबंधी ताडोबाच्या समितीने एफआयआर दाखल केल्यानंतर आता कंपनीकडून फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. जवळजवळ १२ कोटी १५ लाख रुपये या कंपनीकडे थकीत आहेत.



ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट


ताडोबा हा जगभरातील एक प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. हजारो लोक विश्वासाने ताडोबाच्या वेबसाईटला भेट देत असतात. अशा प्रकल्पाची तब्बल १२ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक होणं, ही गोष्ट ताडोबाच्या नावलौकिकाला गालबोट लावणारी आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि