Bhashini tool : डिजिटल इंडियाची यशस्वी वाटचाल; भाषांमधील अडथळे दूर करण्यासाठी AI आधारित ‘भाषिणी’ टूल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा


नवी दिल्ली : भारत (India) हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेकविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, प्रत्येकालाच प्रत्येक भाषा येते असं नाही. अशावेळी भाषांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एआय (AI) आधारित ‘भाषिणी’ (Bhashini) प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शनिवारी जी २० (G20) डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना ही घोषणा त्यांनी केली आहे.


भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इंडियाच्या (Digital India) दृष्टीने ही एक यशस्वी वाटचाल आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.



डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. यात डिजिटल अर्थव्‍यवस्था ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल पेमेंट करण्यात भारत सर्वात आघाडीवर आहे. देशातील सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्याच्या खात्यावर जमा होतो, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होते. तसेच यामुळे ३३ बिलियनहून अधिक पैशांची बचत झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.



जॅम ट्रिनिटीचा अनेकांना फायदा


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, UIDAI ने विकसित केलेले आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. लाभार्थी ओळखण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जात आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सरकारने सुरू केलेली जनधन, आधार आणि मोबाइल (JAM trinity) या संकल्पना देखील अधिक फायदेशीर ठरत आहेत. २०१५ साली आम्ही डिजिटल इंडियाची सुरुवात केली आहे आणि या गेल्या नऊ वर्षात भारतात डिजिटल क्रांती झाली आहे. यूपीआयद्वारे (UPI) १० अब्ज रुपयांची देवाणघेवाण महिन्याला होते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदकडून हवालामार्गे आले २० लाख ? तपासकर्त्यांसमोर नवीन कोडे

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासात गुप्तचर यंत्रणांना डॉ. उमर, डॉ.

लाल किल्ला स्फोट प्रकरणात नवे धागेदोरे; आरोपी डॉ. उमर उन-नबी नुहमध्ये गुप्तपणे वास्तव्यास असल्याचा तपास यंत्रणांचा दावा

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ ह्युंडाई i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरू असलेल्या चौकशीत

भारत-नेपाळ सीमेवर कारवाई; व्हिसा नसल्याने दोन विदेशी नागरिक अटकेत

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा आणि

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या