Reserve Bank of India : कर्जधारकांसाठी आरबीआयचा दिलासा! कर्ज खात्यातील दंड वसुलीसाठी नव्या गाईडलाईन्स

Share

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) बँका आणि वित्तीय संस्थांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात कर्ज खात्यातील दंड वसुलीसाठी अनेक नियमांबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून त्या लागू होणार आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं बदललेल्या नियमांची माहिती अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये आरबीआयने परिपत्रक शेअर केलं आहे. परिपत्रकामध्ये बदललेल्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बँका कर्जावर आकारल्या जाणार्‍या व्याजात दंडाची भर घालत आहेत आणि त्या आधारावर कर्जदारांकडून व्याजावर व्याज आकारत आहेत, अशा अनेक अलीकडच्या घडामोडींनंतर आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार, कर्जाचे हफ्ते चुकल्यास, बँकांकडून आकारला जाणारा दंड हा दंडात्मक व्याज म्हणून नव्हे तर दंडात्मक शुल्क म्हणून गणला जाईल.

कोणत्या बँकांना गाईडलाईन्स लागू होणार?

स्मॉल फायनान्सेस बँक, लोकल एरिया बँक आणि रिजनल रुरल बँकांना नवा नियम लागू असेल, तसेच, पेमेंट बँकांनाही हा नियम लागू होईल. सर्व प्रायमरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, एनबीएफसी आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या अखिल भारतीय वित्तीय संस्था जसं, एक्जिम बँका, NABARD, NHB, SIDBI आणि NaBFID सारख्या वित्तीय संस्था देखील RBI च्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेत येतील.

रिझर्व्ह बँकेने लाँच केले ‘उद्गम’ वेब पोर्टल

देशभरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपये बेवारसपणे पडून आहेत. या रक्कमांवर कोणीही दावा केला नाही. परंतु सामान्य लोकांना अशा बँकांतील रक्कम शोधण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘उद्गम’ (UDGAM) नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे (RBI Launches UDGAM For Unclaimed Deposits). या पोर्टलद्वारे कोणतीही व्यक्ती बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

2 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

2 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

2 hours ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

3 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

3 hours ago