मुंबई : गणपतीच्या मूर्ती बनवणार्या कार्यशाळा जागोजागी दिसायला लागल्या की गणेशोत्सवाची चाहूल लागते. मग रोज वाटेतून येता जाता दिसणार्या गणपतीला कधी एकदा घरी आणून सजवलेल्या मखरात बसवतोय, असं प्रत्येक गणेशभक्ताला वाटत असतं. यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवाला केवळ एक महिना राहिला असून सर्वांनाच गणपतीच्या आगमनाचे वेध लागले आहेत.
यंदा गणपतीच्या सजावटीसाठी कोणती थीम ठेवायची, याबद्दल जोरदार तयारी सुरु झाली आहे. काहींनी गणपतीची मूर्ती बुकदेखील करुन ठेवली आहे. आपल्या घरचा बाप्पा वेगळा दिसला पाहिजे, यासाठी उत्साही भाविक आतापासूनच कलाकुसर करण्यासाठी सामानाची जमवाजमव करत आहेत. या सगळ्या उत्साहपूर्ण माहोलमध्ये ठिकठिकाणी गणपतीला बसण्यासाठी मखरही सजल्याचे पाहायला मिळत आहेत.
दादरमधील छबिलदास लेन येथे असलेल्या वनमाळी हॉलमध्ये दरवर्षी सुबक मखर बनवले जातात आणि त्यांना ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. ‘हरदेव आर्टस’ यांनी यावर्षीही या ठिकाणी सुंदर आकार असलेले, पानाफुलांची, मोराची नक्षी असलेले मखर विक्रीसाठी ठेवले आहेत. लहान मोठ्या आकारांतील वेगवेगळ्या प्रकारचे हे इको-फ्रेंडली मखर ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या मखरांची एक खास झलक ‘प्रहार’च्या वाचकांसाठी टिपली आहे आमचे छायाचित्रकार अरुण पाटील यांनी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…