मुंबई: भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात १८ ऑगस्टपासून टी-२० मालिका खेळवली जात आहे. जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत. तो दीर्घकाळानंतर संघात परतत आहे. बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र आता तो फिट आहे. बुमराह नुकताच नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला. त्याच्या गोलंदाजीने फलंदाजाला चांगलेच हैराण केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुमराहच्या गोलंदाजीचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यावर चाहते विविध कमेंट करत आहेत.
टीम इंडियाने खेळाडूंच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात बुमराह नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. बुमराहच्या बॉलमुळे नेट्समध्ये बॅटिंग करणारा खेळाडू चांगलाच हैराण झाला. या व्हिडिओवर असंख्य चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
बुमराहचे चाहते दीर्घकाळापासून तो संघात कधी परततो याची वाट पाहत होते. बुमराहला टीम इंडिया आशिया कपसाठीही संघात जागा देऊ शकते. यासोबतच मॅनेजमेंट वर्ल्डकपबाबतही त्याचा विचार करू शकते.
भारत आणि आयर्लड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना १८ ऑगस्टला खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना २० ऑगस्ट आणि तिसरा सामना २३ ऑगस्टला खेळवला जाणार आहे. हे सर्व सामने डबलिनमध्ये होणार आहेत. भारताने बुमराहच्या नेतृत्वातील संघामध्ये युवा खेळाडूंचा भरणा केला आहे. भारताने ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा आणि रिंकू सिंहला संघात स्थान दिले आहे. तसेच यासोबतच वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, मुकेश कुमार आणि आवेश खानही संघात आहेत.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…