मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरे गटातील विभाजनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस गटातही फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) नेते अजित पवार (ajit pawar) यांनी काकांचा हात सोडून भाजपचा (bjp) हात धरला. ते सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. दोन्ही नेते पक्षावर आपला दावा करत आहेत. तसेच लोक त्यांच्यासोबत आहेत असाही दावा ते करत आबेत. या सर्व गोंधळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार येत्या १७ ऑगस्टला महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्याचा दौरा करत आहे. मात्र त्याआधी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये एकीकडे शरद पवार आहेत तर दुसरीकडे हात जोडत दिसलेले अजित पवार आहेत. पोस्टमध्ये मोठ्या अक्षरात लिहिले आहे की साहेब, बीडमध्ये आपले हार्दिक स्वागत. कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या…! आपला माणूस कामाचा माणूस.
बीड जिल्हा हा धनंजय मुंडेचा गड मानला जातो. सध्या धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटासह आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये कृषीमंत्री आहेत. १५ ऑगस्टला धनंजय मुंडे बीडमध्ये पोहोचले होते. जेव्हा त्यांना शरद पवारांबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की वेळच सांगेल की कोण कोणावर भारी आहे. दरम्यान, स्वातंत्र्यदिन असल्याने मुंडे आणखी काही बोलले नाहीत.
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यामध्ये भेट झाली होती. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट कोरेगाव पार्क येथील बंगल्यावर झाली होती. या
भेटीवरूनही बरेच राजकारण रंगले होते. यावरून त्यांनी नंतर स्पष्टीकरणही दिले. शरद पवार म्हणाले की अजित पवार त्यांचे भाचे आहेत. अशातच कुटुंबातील सदस्याला भेटणे काय वाईट आहे. कुटुंबातील एका सदस्याला दुसऱ्याला भेटायचे असल्यास काय प्रॉब्लेम आहे. सोबतच त्यांनी हे ही स्पष्ट केले की त्यांचा पक्ष भाजपसोबत जाणार नाही.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…