दिल्लीत इंडिया आघाडीत फूट?काँग्रेसची सर्व ७ जागांवर लढण्याची घोषणा, आपचे सूचक विधान

  153

नवी दिल्ली: एनडीएला (NDA) कडवी टक्कर देण्यासाठी २६ विरोधी पक्ष एकाच मंचावर एकत्र आले आहेत. यांनी पक्षांनी आपल्या आघाडीला I.N.D.I.A हे नाव दिले आहे. सर्व विरोधी पक्ष (opposition party) एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर करण्याचा दावा करत आहेत. मात्र जागा वाटपावरून येथील पक्षांमध्ये अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. असे मानले जात आहे की आगामी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.


यात दिल्लीमध्ये आघाडीत बिघाडी होत असल्याचे दिसत आहे. कारण, काँग्रेसने राजधानी दिल्लीतील सर्व लोकसभा जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत काँग्रेस नेतृत्वात एक महत्त्वाची बैठक पार पडली. यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केसी वेणुगोपालसह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष दिल्लीतील सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांचा स्वत:चा एक मार्ग आहे आणि या बैठकीत आम आदमी पक्ष अथवा इतर आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली.


दिल्लीत तीन मुख्य पक्ष आहेत ते म्हणजे आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप. लोकसभा निवडणुकीसाठी एकाच मंचावर एकत्र आलेल्या पक्षांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टी आहे. अशातच काँग्रेसने राजधानी दिल्लीतील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा घेतलेला हा निर्णय आघाडीसाठी एखाद्या झटक्याहून कमी नाही.


काँग्रेस नेता अनिल चौधरीने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या आघाडीबाबत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर सांगितले, काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करत एकजून होऊन लढणार. आम्ही आम आदमी पक्ष अथवा आघाडीची कोणतीही चर्चा केली नाही. काँग्रेसच्या या तीन तास चाललेल्या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि दीपक बाबरिया उपस्थित होते.





आम आदमीचा पलटवार


काँग्रेसच्या बैठकीनंतर आम आदमी पक्षानेही याबाबत विधान केले आहे. दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख प्रवक्ता सौरभ भारद्वाज म्हणाले की, जेव्हा 'INDIA' आघाडीतील सर्व पक्ष एकत्र येतील, जागा वाटपावर चर्चा करतील, सर्व पक्षांचे राष्ट्रीय नेतृत्व समोर येत चर्चा करतील. तेव्हा समजेल की कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळतील. ही खूप पुढची गोष्ट आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने