मथुरा: उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये मंगळवारी बांके बिहारी मंदिराजवळ मोठी दुर्घटना घडली. येथील दुसायत मोहल्ल्यामध्ये तीन मजली जुनी इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने तब्ब १२ लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी पुलकित खरे यांनी पाच लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. जखमींच्या उपचारासाठी वृंदावनच्या सौ शैया रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पावसामुळे तीन मजल्याची इमारतीचा छज्जा कोसळला.
VIDEO | A portion of an old building collapses near Banke Bihari Temple in Vrindavan. More details are awaited. pic.twitter.com/lRUd9H7GTr
— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2023
डीएम पुलकित खरे यांनी सांगितले की जुन्या इमारतीचा छज्जा आणि भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, ज्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला तसेच जे जखमी झाले त्यांना मदतकार्य दिले जाईल. दरम्यान, ही दुर्घटना का घडली याचा तपास केला जाईल. मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे पाऊस कोसळत आहे.
Visuals from the site near Banke Bihari Temple in Vrindavan where a portion of an old building collapsed earlier today. pic.twitter.com/GTlObysqtA
— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2023
दुसरीकडे एसएसपी शैलेश पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसायत मोहल्लेकडे एक जुनी तीन मजली घर होते. मात्र अचानकपणे घरचा वरचा भाग कोसळला. यामुळे मलब्याखाली अनेक जण दबले गेले. पोलिसांच्या टीमसोबत फायर बिग्रेड टीमही बचावकार्यात व्यस्त आहे. दरम्यान, नगर विकास अधिकाऱ्यांच्या टीमलाही घटनास्थळी बोलावले आहे. जर इमारतीचा एखादा भाग जर कोसळलेला असेल तर या घराला पाडण्याचे काम केले जाईल. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.