विकी कौशलचा द ग्रेट इंडियन फॅमिली २२ सप्टेंबरला प्रदर्शित होणार!

मुंबई : यश राज फिल्म्स’ची आगामी कलाकृती द ग्रेट इंडियन फॅमिली (The Great Indian Family -TGIF) मध्ये विकी कौशलची मुख्य भूमिका आहे. विजय शंकर आचार्य यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा सिनेमा यावर्षी २२ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शनासाठी तयार आहे.


विकी कौशल याचा अलीकडे प्रदर्शित झालेला 'जरा हटके जरा बचके' तुफान गाजला, त्यामळे तो सध्या आपल्या करियरमध्ये चांगल्या ऊंचीवर आहे. त्यानंतर विकी या कौटुंबिक मनोरंजनपटाकडे वळला. या सिनेमाची कथा भारताच्या हृदयस्थळात घडते आणि विकीच्या वेडपट कुटुंबाभोवती फिरणारी आहे. कथेतील परिस्थितीनुरूप घोटाळा नियंत्रणाबाहेर जातो आणि कथेची रंगत वाढते!


विकी आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करताना आज व्हीडिओमध्ये त्याच्या धमाल कुटुंबाची ओळख प्रेक्षकांना करून देतो. हा सिनेमा लहान-थोर, सर्वांसाठी मजेची पर्वणी आहे.



व्हीडिओ इथे पहा


&feature=youtu.be

विकी कौशल या अभिनेत्याचा आपल्या देशात मोठा चाहता वर्ग आहे, त्याने उरी, मसान, राझी, संजू, सरदार उधम, मनमर्जीयां, जरा हटके जरा बचके अशा सिनेमांत उत्तम अभिनय साकारला!


आज हिंदी सिनेक्षेत्र सर्वोत्तम कंटेंटवर आधारीत आहे, विकी कौशल याने निवडलेले सिनेमे पाहिल्यास त्याचा कल कायमच उत्तम संहितांकडे असलेला दिसतो. अलीकडे प्रेक्षकांना चांगला सिनेमा पाहायचा असतो, द ग्रेट इंडियन फॅमिली (टीजीआयएफ) ही नक्कीच एक अशी फिल्म ठरेल. विकी कौशलसारख्या हरहुन्नरी अभिनेत्यामुळे चांगला सिनेमा चर्चेत असेल!

Comments
Add Comment

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या

तरुण तुर्क : तोरडमल ते तोडणकर...

राज चिंचणकर, राजरंग ज्येष्ठ नाटककार व रंगकर्मी प्रा. मधुकर तोरडमल यांनी त्यांच्या नाटकांतून भूमिकाही रंगवल्या

'हि-मॅन'ला शेवटचे पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता; नवीन वर्षाची सुरुवातच होणार देशभक्तीने

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. मात्र बॉलिवूडचा हि-मॅन कायमच आपल्या

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला

देवदास ते दिल तो पागल है - २०२५ मध्ये पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट

क्लासिक ते कल्ट : २०२५ मध्ये सिनेमागृहांत पुन्हा झळकलेले आयकॉनिक हिंदी चित्रपट नॉस्टॅल्जिया हा मोठा सिनेमॅटिक

'आयुष्यभराचा सॅंटा' म्हणत मराठी अभिनेत्रीने करून दिली होणाऱ्या नवऱ्याची ओळख

मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या